फेसबुकला भरावा लागणार ३३५ अब्ज रुपये कर

facebook
लंडन – अमेरिकेत ३३,५०० कोटी रुपयांचा कर सोशल मीडिया कंपनी फेसबुकला द्यावा लागण्याची शक्यता असून आपली संपत्ती कंपनीने आयर्लंडला हलवण्याबाबत (ट्रान्सफर) हे प्रकरण असून यासंबंधी कंपनीने अवैध मार्गाचा अवलंब केला आहे का, याचा तपास महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यासंबंधी महसूल विभागाच्या वतीने कंपनीला २७ जुलै रोजी

कर वाचवण्यासाठी कंपनीने अवैध मार्गाचा अवलंब केला असल्याचे सिद्ध झाल्यास कंपनीकडून पूर्ण रकमेवर व्याजासह कर वसूल केला जाईल. तसेच त्यावर दंड लावण्यात येईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही सर्व नियमांचे नेहमीच पालन करत असल्याचे स्पष्टीकरण फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. कंपनीने जून तिमाहीमध्ये ६.२४ अब्ज डॉलरचा (४२,००० कोटी रुपये) विक्रमी नफा घोषित केला होता.

आयर्लंडमध्ये १२.५ %, अमेरिकेत ३५ % कर : फेसबुकने आपली काही मालमत्ता २०१० मध्ये आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये हलवली होती. महसूल विभाग २०१३ पासून या प्रकरणाची चौकशी करत आहे. आयर्लंडमध्ये व्यावसायिक कराचा दर फक्त १२.५ टक्के असून अमेरिकेत मात्र तो ३५ टक्के तर इंग्लंडमध्ये २१ टक्के आहे.

Leave a Comment