झेडटीई आणला जगातील भन्नाट फोन

zte
मोबाईल उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या झेडटीई ने जगातील एक असा भन्नाट स्मार्टफोन आणला ज्याचे नाव झेडटीई अॅक्सॉन २ असे असून या फोनमध्ये एवढे भन्नाट फिचर्स आहेत कि इतर कोणतीही मोबाईल कंपनी तुम्हाला देऊ शकत नाही असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या फोनमध्ये तुम्हाला ५.५ इंचाचा १४४० x २५६० पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याला कोर्निंग गोरीला ग्लास ४ प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात अँड्रॉईड मार्श्मेलो ६.०.० ऑपरेटिंग सिस्टम तर क्वालकॉम MSM८९९६ स्नॅपड्रॅगन ८२० चा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनचे दोन व्हेरीयंट असून एकात डयुलकोअर २.१५ GHzचा आणि दुसऱ्यात डयुलकोअर १.६ GHzचा सीपीयू देण्यात आला आहे. या फोनच्या ६४ जीबीच्या व्हेरीयंटमध्ये ४ जीबीचे रॅम तर १२८ जीबीच्या व्हेरीयंटमध्ये ६ जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. याचा रिअर कॅमेरा २० मेगापिक्सलचा असून त्याला ऑटोफोकस OIS, dual-LED (dual tone) flash फंक्शन देण्यात आले आहे. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. याचे वैशिष्टय म्हणजे यात स्टिरीओ सिस्टम साउंड देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात वायफाय ८०२.११, ब्ल्यूटूथ, जीपीएस या सारख्या विविध अत्याधुनिक कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता ३२५०mAh ऐवढी असून हा फोन इओन गोल्ड आणि सिल्व्हर कलरमध्ये आहे. त्याचबरोबर याची बॉडी पूर्णपणे मेटलची आहे. याफोनची किंमत अंदाजे २८००० रुपये असण्याची शक्यता आहे.

1 thought on “झेडटीई आणला जगातील भन्नाट फोन”

Leave a Comment