जीपची ग्रँड चरोकी दिवाळीत भारतात येणार

jeep
जीप इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार जीप कंपनीची एसयूव्ही ग्रँड चरोकी दिवाळीच्या दरम्यान भारतात सादर केली जाणार आहे. भारतात दोन व्हर्जनमध्ये ती येईल. लिमिटेड व समिट ही ती दोन व्हर्जन आहेत शिवाय परफॉर्मन्स व्हर्जन एसआयटी ही याच काळात भारतात सादर होईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

या गाडीचा लूक एकदम क्लासी असून तिला बायजेनन एचआयडी हेडलँप व एलईडी टेललँप दिले गेले आहेत. पहिल्या दोन्ही व्हर्जनासाठी ३.० लिटरचे डिझेल इंजिन तर एसआरटीसाठी ६.४ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. आठ स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स आहे. डिझेल गाडी लिटरला १२.८ किलोमीटरचे अॅव्हरेज देत आहे. लिमिटेडसाठी ५ इंची तर समिट व एसआरटीसाठी ८.४ इंची टच स्क्रीन नेव्हीगेशन सपोर्टसह दिला गेला आहे. फ्रंट सीट अॅडजेस्टीबल असून आठ प्रकारे त्या अॅडजस्ट करता येतात. सर्व सीटसाठी हिटींग फंक्शन आहेच पण समिट व एसआयटीसाठी फ्रंट सीट व्हेंटीलेशन फिचरही दिले गेले आहे.

सुरक्षेसाठी अनेक फिचर्स आहेत. त्यात ड्युल फ्रंट, ड्रायव्हरच्या गुडघ्यांसाठी कर्टन एअरबॅग, हिल असेंड, डिसेंड, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रोनिक स्टबिलीटी कंट्रोल, रेन ब्रेक, सपोर्ट फ्रंट, रिअर पार्किंग सेन्सर, रियर व्ह्यू कॅमेरा अशी फिचर्स आहेत. ग्राहकाला दोन वर्षांची व अ्रनलिमिटेड किमीसाठी वॉरंटी व रोड साईड सुविधा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment