आयबॉलचा फिंगरप्रिंट सेन्सरवाला टॅब्लेट बाजारात दाखल

iball
मुंबई – गुप्तचर विभाग व चोरी प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून उपयुक्त डिवाईसेस म्हणून संगणकीकृत्त फिंगरप्रिंट सेन्सरचा उपयोग केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या वरदानासह, त्याच्या नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञान उत्पादनांसाठी ओळखला जाणारा ब्रँड आयबॉलने फिंगरप्रिंट सेन्सरने युक्त ‘आयबॉल स्लाईड बायोमेट’ दाखल केला आहे, जो तुमची गोपनीयता राखण्यात मदत करतो.

आयबॉल स्लाईड बायोमेटमध्ये बायोमेट्रिक फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, ज्याचा डिव्हाईस ५ बोटांना ऑथेन्टीकेशन ऍक्सेसची सुविधा प्रदान करतो. याची स्क्रिन ८ इंचाची असून त्यात १२८०x ८०० पिक्सेल्ससह आयपीएस एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. १.३ गिगाहर्टझ क्वॉड कोअरचा प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आणि १ जीबी रॅम देखील देण्यात आले असून याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. याची बाजारात ७९९९ रुपये एवढी किंमत आहे.

Leave a Comment