योगासाठीही विदेशींना मिळणार पर्यटन व्हीसा

yoga
दिल्ली- योगाचा प्रसार व महत्त्व जगभरातील नागरिकांना समजून देण्याचा एक प्रयत्न म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतात येऊ इच्छीणार्‍या परदेशी लोकांना पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यंदा २१ जूनला साजरा होत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस चंदिगढ येथे साजरा केला जाणार आहे. त्याच्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.

पर्यटन व्हीसा देण्याच्या यादीत आजपर्यंत मनोरंजन, नैसर्गिक पर्यटन, मित्र, नातेवाईक यांच्या भेटी, वैद्यकीय उपचार, छोटा व्यापार या गोष्टींचा समावेश होता. त्यात आता योगाचा समावेश केला गेला आहे. चंदिगडमध्ये यंदा साजर्‍या होत असलेल्या योग दिनात किमान ५० हजार नागरिक सामील होतील असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांच्यासाठी चीनी मॅट ऐवजी मेड इन इंडिया मॅट पुरविण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment