व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप अॅप लॉन्च

whatsapp
व्हॉट्सअॅप युझर्ससाठी चांगली बातमी आहे. यूझर्सला आता घरी असल्यास मोबाईलवरुन आणि ऑफिसमध्ये असल्यास डेस्कटॉपवरुन व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. कारण आता व्हॉट्सअॅपकडून डेस्कटॉप अॅप लॉन्च करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅपचे हे डेस्कटॉप अॅप वेब व्हॉट्सअॅपसारखे काम करेल. व्हॉट्सअॅपचे हे नवे डेस्कटॉप अॅप विंडोज ८ आणि त्यापुढील ओएस तर मॅक १०.९ आणि त्यापुढील ओएसवर काम करेल. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरल्यास डेस्कटॉप कीबोर्डच्या माध्यमातून चॅटिंगही वेगवान होते. शिवाय, टायपिंग करताना अडचणी येत नाहीत आणि अनेक शॉर्टकट्सचाही वापर करता येतो.

व्हॉट्सअॅपचं डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करण्यासाठी आपल्या डेस्कटॉप ब्राऊजरवरुन https://www.whatsapp.com/download या लिंकवर जा आणि अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. ऑफिसमध्ये काम करत असताना यूझर्सना आता वारंवार स्मार्टफोन पाहावे लागणार नाही. कारण तुमचे काम करता करता व्हॉट्सअॅप वापरणे अधिक सुलभ होणार आहे. आता यूझर्स डेस्कटॉप अॅपला किती प्रतिसाद देतात हे पाहणे औस्तूक्याचे ठरेल.

Leave a Comment