मायक्रोमॅक्सने लॉन्च केला ‘कॅनव्हास मेगा २’

micromax
आपल्या कॅनव्हास सीरीजचा नवा फॅबलेट कॅनव्हास मेगा-२ मायक्रोमॅक्स कंपनीने लॉन्च केला आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा-२ स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ६ इंचाचा डिस्प्ले आणि ३०००mhz क्षमतेची बॅटरी. मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा २ फॅबलेटमध्ये ६ इंचाचा डिस्प्ले असून, ९६०x५४० पिक्सेल रिझॉल्युशन आहे. या स्मार्टफोनमध्ये १.३ghz क्वाड-कोर प्रोसेसर असून, १ जीबी रॅम आहे. इंटरनल मेमरी स्टोरेज ८ जीबी देण्यात आले आहे, तर मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. ५.० लॉलिपॉप अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये आहे. रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३०००mhz क्षमतेची बॅटरी असून, कनेक्टिव्हिटीमध्ये ४g, ब्लूटूथ ४.०, वाय-फायसारखे फीचर्सही आहेत. काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्सने कॅनव्हास ६ आणि कॅनव्हास ६ प्रो लॉन्च केले होते.

Leave a Comment