२२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार ‘इस्रो’

isro
चेन्नई : पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) आहे. इस्रो येत्या मे महिन्यात लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.

मे महिन्यात पीएसएलव्ही सी३४ या प्रक्षेपकाद्वारे कार्टोसॅट २सी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासोबत इतर २१ उपग्रहांचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. यात अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह असणार आहेत. मे महिन्यात होणाऱ्या प्रक्षेपणात आम्ही २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याच्या विचारात आहोत. याआधी आम्ही एकाच वेळेस १० उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले आहे. आता आम्ही दुप्पटीपेक्षा जास्तचा विचार करत आहोत. हे प्रक्षेपण मे महिन्यात होईल अशी आम्हाला आशा आहे, असे विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे संचालक के सिवन म्हणाले. २०१३ साली अमेरिकेच्या ‘नासा’ने २९ उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले होते. हा एक जागतिक विक्रम आहे.

Leave a Comment