
नवी दिल्ली : देशातील ई-केटरिंग सेवेचा विस्तार वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून तब्बल ४०८ रेल्वे स्टेशनवर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सेवे अंतर्गत प्रवाशांना खाण्या-पिण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वेतल्या जेवणाची व्यवस्था करणारी कंपनी इंडीयन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमीटेड अर्थात आयआरसीटीसीने या पूर्वीदेखील देशातल्या ४५ रेल्वे स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू केली होती. रेल्वे मंत्रालयाकडून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या सेवेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असल्यामुळे या सेवेचा विस्तार देशातल्या ४०८ स्टेशन्सवर करण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
४०८ रेल्वे स्टेशनवर ई-केटरिंग
ही सेवा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सुरू केली. दरम्यान, ही सेवा केवळ त्या-त्या रेल्वे स्टेशनवरच देण्यात येणार असून चालत्या रेल्वेत ही सुविधा मिळणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात या सुविधेविषयी घोषणा करण्यात आली होती त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. १२३ या नंबरवर जेवणाची ऑर्डर तुम्ही देऊ शकता तसेच यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी सेवादेखील प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशाच अन्य चार प्रकारे रेल्वे प्रवासादरम्यान जेवण मागविण्यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. त्यामध्ये फूड ऑन ट्रॅक अॅप डाऊनलोड करून जेवणाची ऑर्डर देता येणार आहे तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ई केटरिंगद्वारे आपले मनपंसत जेवण आपण जिथे रेल्वेत बसलो आहोत त्या सीटवर मागू शकतो. चौथी पद्धत अशी आहे की, इंटरनेट आणि स्मार्ट फोनपासून दूर आहे. यामध्ये आपणास १३९ क्रमांकावर एसएमएस करून आपला पीएनआर आणि सीट नंबर सांगावा लागेल त्यानंतर जेवण आपल्यास बसल्या जागेवरच पोहोचेल.
या कंपन्यांचे मिळणार जेवण – बिकानेरवाला, निरलस, सागर रत्न, सर्वाना भवन, हल्दीराम, स्ट्रीट फुडस, केएफसी, मॅक्डोनॉल्ड, डोमिनोज आणि जिज्जा हट आदी कंपन्यांचे उत्कृष्ट जेवण रेल्वे प्रवांशाना ई – केटरिंगद्वारे मिळणार आहे.
