ईमेलचे प्रणेते रे टॉमिल्सन यांचे निधन

tomilson
वॉशिंग्टन – शनिवारी ह्रद्यविकाराच्या झटक्याने ईमेलचे प्रणेते अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.

१९७१मध्ये बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना रे टॉमिल्सन यांनी पहिला ईमेल पाठवला होता. त्यानंतर ख-या अर्थाने ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली तेव्हा इंटरनेटची सुरुवातदेखील झाली नव्हती. मात्र भारतात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली होती.

टॉमिल्सन यांनी १९६० सालीच एसएनडीएमएसजी या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचे तंत्र विकसित केले होते. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. २०१२मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता.

Leave a Comment