
चीनी स्मार्टफोन कंपनी एलईटिव्हीने जगातील सर्वाधिक पॉवरफुल प्रोसेसरचा स्मार्टफोन ली मॅक्स प्रो नावाने सादर केला आहे. या फोनसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० दिला गेला आहे. हा फोन सध्या फक्त चीनमध्ये ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे. फोनची किंमत आहे २१ हजार रूपये. सुरवातीला फक्त १ हजार फोनच विकले जाणार असून त्यासाठी फलॅशसेल लावला जाणार आहे.
ली मॅक्स प्रो – एलईटीव्हीचा नवा स्मार्टफोन
या फोनला ४ जीबी रॅम दिली गेली आहे व फोन हँग होणार नाही असा कंपनीचा दावा आहे. युजर त्यावर मल्टीटास्कींग करू शकेल व अनेक अॅप्स इन्स्टॉलही करू शकणार आहे. फोनला ६.३३ इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले, अँड्राईड ६.० मार्शमेलो ओएस, २१ एमपीचा ड्युअल एलईडी फलॅशसह रियर कॅमेरा व ४ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन ३२,६४ व १२८ जीबी मेमरीसह असून डयुअल सिम आहे. फोरजी बरोबरच एलटीई कनेक्टिव्हीटी, यूएसबी सी पोर्टही दिले गेले आहे. फोनची बॅटरी ३४०० एमएएच पॉवरची आहे.
