किराणा दुकान चालवत होता फ्रीडम मोबाईलचा मालक

mohitkumar-goel
मेरठ – आज संपूर्ण देशभर रिंगिंग बेल्स प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या फ्रीडम २५१ची चर्चा होत आहे. या मोबाईल कंपनीचे मालक मोहितकुमार गोयल यांचा परिवार शामली येथील गढी पुख्ता येथे राहणारा असून मोहितकुमार यांचे वडील राजेशकुमार गोयल यांचे शामलीतील रेल्वे रोडवर एक किराणा मालाचे दुकान आहे.

आपल्या मुलाबद्दल सार्थ विश्वास दाखवताना ते म्हणतात, मला माहीत होते की माझा मुलगा एक ना एक दिवस आमचे नाव उज्ज्वल करणार. पुढे ते सांगतात, महिन्याभरा पूर्वीच त्याने एक कंपनी उघडण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला. त्यासाठी मी त्याला पैसे दिले. त्यानंतर त्याने माझ्यासमोर या मोबाईलची कल्पना मांडली.

मोहितचे प्रारंभिक शिक्षण शामलीच्या सेंट आरसी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मोहितने नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटीतून ग्रेज्यूएशन पूर्ण केले. तीन वर्षांपूर्वी पर्यंत मोहित शामलीत आपल्या वडिलांसोबत त्यांचे दुकानच सांभाळायचा. मागील वर्षाच्या सुरुवातीला मध्यप्रदेशमधील भाजप आमदार ओम प्रकाश सकलेचा यांची भेट घेतली. त्यादरम्यान मोहितने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची कल्पना त्यांच्या समोर मांडली. त्यानंतर रिंगिंग बेल्‍स कंपनीचा प्रवास सुरु झाला.

Leave a Comment