थिरूवनंतपुरम – भारताची एव्हरग्रीन सिटी

trivendram
भारताचे राष्ट्रपिता म.गांधी यांनी एव्हरग्रीन सिटी ऑफ इंडिया म्हणून गौरविलेली केरळची राजधानी त्रिवेंद्रम म्हणजेच थिरूवनंतपुरम हे एक सुंदर पर्यटनस्थळही आहे. देशातील सर्वाधिक हरित १० शहरांत याचा समावेश आहेच पण संस्कृती, परंपरा आणि मस्त हवा यासाठीही हे शहर पर्यटकांचे लाडके आहे. या गावाचे नांव शेष नागावरून आले असून शेष नाग हे विष्णूचे आसन मानले जाते.

या शहरातील प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर म्हणजे शेष नागावर पहुडलेल्या विष्णूचे मंदिर असून मंदिरातील प्रचंड मूर्ती हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर अतिश्रीमंत मंदिरातील एक आहे. परशुरामाने येथेच समुद्रदेवाबरोबर युद्ध केल्याची कथाही सांगितली जाते. सात पहाडांवर बसलेले हे शहर वेधशाळा, प्राणीसंग्रहालय, पेपियर संग्रहालय, शष्मुखम बीच, कोवालम बीच, अट्टकल देवी मंदिर अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांनी समृद्ध आहे. हे ऐहिासिक शहर ख्रिस्तपूर्व १ हजार वर्षे अस्तित्वात आल्याचेही सांगितले जाते.

या शहराचा खरा विकास झाला तो त्रावणकोर राजांच्या काळात. १७४५ साली त्रावणकोर राजांनी ही राजधानी केली व १९ शतकाच्या मध्यापासून येथे आधुनिकतेचे वारे वाहू लागले आणि याच काळात वेधशाळा, रूग्णालये, इंग्रजी शाळा, ओरिएंटल रिसर्च संस्था, पांडुलिपी पुस्तकालय अशी स्थळे अस्तित्वात आली. ५६ साली केरळ राज्याची स्थापना झाल्यानंतर ही केरळचे राजधानी केली गेली.

Leave a Comment