तांबड्या समुद्राला सूक्ष्मजीवांमुळे रत्नहाराचे सौंदर्य

saudi-arebia
मॉस्को : आपण आजवर काजव्यांच्या रूपात प्रकाशणारे जीव पाहिले आहेत किंबहुना जनुक अभियांत्रिकीने प्रकाशणारे प्राणी तयार करता येतात पण नैसर्गिक रीत्या प्रकाशित सूक्ष्मजीव तांबड्या समुद्रात आढळून आले आहेत. तेथे अशा प्रकाशमान जीवांचा एक रत्नहारच जणू दिसतो. हे जीव हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात. स्कुबा डायव्हिंगसाठी तांबडा समुद्र हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

सौदी अरेबियात फरासान येथे प्रवाळ बेटांवर हे जीव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेला दिसून आले आहेत. हे सागरी जीव प्रकाश बाहेर टाकत असल्याचे अतिनील किरण छानकाला पिवळा फिल्टर लावून शोधण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. दीप्तिमान कंदिलासारखे ते दिसतात, ते हायडड्ढासारखे असले तरी त्यांचे हायडड्ढाशी साधम्र्य नाही. हायडड्ढासारख्या असलेल्या या जीवांच्या वसाहती येथे दिसतात. तेथे नॅसारियस मार्गारिटफायर (सागरी गोगलगाय) हे सजीव असून त्यांची लांबी २०-३५ मि.मी. आहे.

सागरी गोगलगायींच्या वसाहती तेथे आहेत. मृदुकाय प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश असून ते दिवसा गाळात लपतात व रात्री सरपटताना दिसतात. ते अपृष्ठवंशीय जीवांना खाऊन जगतात. हे सागरी जीव नेहमी वसाहतीने राहतात. या गोगलगायींवर सायटीयस हे सूक्ष्म जीव असतात व ते हिरवा प्रकाश बाहेर टाकतात. एका गोगलगायीवर असे १२६ सूक्ष्म जीव असतात. त्यामुळे या गोगलगायी असलेला भाग ख्रिसमस टड्ढीसारखा प्रकाशित दिसतो, असे लोमोनोस्कोव

मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे व्याचेस्लाव इव्हानेन्को यांनी सांगितले. आता शोधलेले सूक्ष्म जीव हिरवा प्रकाश बाहेर टाकतात. ते हायड्रोझोवाची नवी प्रजात असून त्यांची लांबी १.५ मि.मी. आहे. त्यांच्या तोंडाजवळ हिरवा प्रकाश असल्याने तो बॅटरीसारखा उपयोगी पडतो. इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांना तो चंद्रप्रकाशात व सूर्यास्त-सुर्योदयाला जाणवतो. प्रकाश बाहेर टाकणारे अँथोझोआ नावाचे प्रवाळही प्रकाश बाहेर टाकतात. हायड्रोइड जेलीफिश तसेच लँसेलेट (सेफॅलोकोरडाटा) व कॉम्बजेलीज (सेटेनोफोरा) हे सजीवही प्रकाशित दिसतात, कारण त्यांच्यात तशी प्रथिने असतात. प्राणिवैज्ञानिकांच्या मते हायड्रोझोआचा अभ्यास तीन प्रजातींपुरता मर्यादित आहे.

जेलीफिशमध्ये प्रकाश टाकणारी यंत्रणा जीवनक्रमात खूप आधी तयार होते. सायटीयस या नव्या प्रजातीचा प्रकाश हा ५१८ नॅनोमीटर तरंगलांबीचा आहे. इव्हानेन्को यांच्या मते या प्रजातीची तुलना तांबड्या समुद्रातील इतर हायड्रोइडशी करण्यात आली आहे, त्याचे केंद्रक व मायटोकाँड्रीया डीएनएचे विश्लेषणही करण्यात आले आहे. या प्रकाशामुळे या सजीवांचे भक्ष्य असलेले जीव त्यांच्याकडे आकर्षित होतात. प्रकाशमानतेमुळे त्यांची ओळखही वैज्ञानिकांना चटकन पटते. ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.