
जगातील कोणत्याही देशाचा नंबर आपल्या मोबाईलसाठी निवडणे कांही अॅप्समुळे शक्य झाले आहे. व्होवोक्स हे असेच एक अॅप युजरला तुम्ही भारतात राहात असलात तरी अमेरिका अथवा युरोपिय संघातील कोणत्याही देशाचा नंबर तुमच्या मोबाईलसाठी निवडण्याची सुविधा देते. स्मार्टफोनमुळे जगच जोडले जात असल्याने हे शक्य होते आहे.
कोणत्याही देशाचा नंबर आपल्या मोबाईलसाठी शक्य
आपण भारतात राहातो व ज्या शहरात राहतो, ज्यानुसार आपल्याला फोन नंबर मिळतो. दिल्ली, मुंबई वा अन्य ठिकाणी लँडलाईनवरून फोन करायचा तर त्या अगोदर कोड डायल करावा लागतो. मात्र स्मार्टफोनच्या कनेक्टेड दुनियेमुळे कांही नंबर असेही मिळू शकतात,ज्यावर आपण आपले व्हॉटसअॅप अकौंट सेट करू शकतो. त्यासाठीही अनेक अॅप बाजारात आहेत. अर्थात यासाठी दर महिना १ डॉलर चार्ज भरावा लागतो व त्यानंतर लॉग इन नेम व पासवर्ड सेट करावा लागतो.
व्होवोक्स अॅप डाऊनलोड केल्यानंतरही लॉग इन व पासवर्ड सेट करावा लागतो. लॉग इन करताच आपला नंबर स्क्रीनवर डावीकडे दिसतो. यात युजर कोणत्याही देशाचा नंबर निवडू शकतो. स्काईप व प्रीपेड नंबर प्रमाणे कॉल करण्यासाठी अकौंटमध्ये पैसे भरावे लागतात. तुमचा नंबर बाहेरच्या देशाचा आहे हे फोनवरही दिसू शकते.
