आता पासपोर्ट मिळाल्यानंतर होणार पोलीस व्हेरिफिकेशन

passport
नवी दिल्ली – आता आपल्याला पासपोर्ट बनविण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशनची वाट बघण्याची गरज नाही. यापुढे पोलीस व्हेरिफिकेशनविना आपल्याला पासपोर्ट मिळेल, मात्र पोलीस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला पासपोर्ट मिळाल्यानंतर करावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

स्वराज यांनी ट्विट करून असे म्हटले आहे की, जर आपल्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असेल आणि आपण आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास आम्ही त्याचा पासपोर्ट जारी करू. आपले पोलीस व्हेरिफिकेशन आपल्याला पासपोर्ट मिळाल्यानंतर केले जाईल.

Leave a Comment