आयबॉलचा इंटेल आधारित ८ इंचाचा टॅब्लेट

iball
मुंबई – भारतीय टॅब्लेट पीसी बाजारपेठेमधील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड असलेल्या आयबॉलने इंटेल आधारित आयबॉल स्लाइड ३ जी क्यू ८१ च्या दाखलीकरणाची घोषणा केली, जो अधिक मोठय़ा स्क्रीनसह साधारण गरजांकरिता डिझाइन करण्यात आला आहे.

फक्त ७,९९९ रुपये किंमत असलेल्या, आयबॉल स्लाइड ३ जी क्यू ८१ सह मोठय़ा पडद्यावरील मनोरंजनाच्या पूर्णत: नवीन विश्वात प्रवेश करण्याची हीच वेळ आहे. आयबॉल स्लाइड ३ जी क्यू ८१ स्टाइल परफॉर्मन्स प्रोफाइल्सला पुढील स्तरावर घेऊन जातो. आयबॉल उत्पादने किमतीशी अनुरुप अशी आकर्षक वैशिष्टय़े व उच्च उपयुक्तता वितरित करण्याकरिता प्रसिद्ध आहेत.

कसा आहे हा टॅब्लेट – इंटेल ऍटम एक्स३-१ गिगाहर्टझ ६४ बीट प्रोसेसर, ८ इंचाची स्क्रिन, अँन्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, ५ मेगापिक्सल ऑटो फोकस रिअर कॅमेरासह २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, बॅटरी ४००० एमएएच ली-पॉलीमरची आहे. १जीबी रॅम व आणि मायक्रो एसडी कार्डद्वारे ६४ जीबीपर्यंत विस्तारित होऊ शकणारे ८ जीबी बिल्ट-इन स्टोरेज, एमपी3 प्लेयर्स, एचडी व्हिडिओ प्लेबॅक व एफएम रेडिओ, जीपीएस व ए- जीपीएस क्षमता, वाय-फाय, ब्ल्यू ट्रूथ कनेक्टीव्हिटी, ओटीजी फंक्शन व मायक्रो युएसबी पोर्ट याचा देखील यात समावेश आहे.

Leave a Comment