१७ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घासून बनविला विश्वविक्रम

brush
बंगळूरू – तब्बल १७ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दात घासण्याचा विश्वविक्रम दिल्ली पब्लिक स्कूल, बंगळूरू येथे केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद होणार असल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दिल्ली पब्लिक स्कूलने हा उपक्रम ‘ब्रश राईट, स्माईल ब्राईट’ नावखाली राबविला होता. या उपक्रामात ६ ते १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात १५ हजार दिल्ली पब्लिक स्कूलचे तर २ हजार ७०० इतर आठ शाळेच्या विद्यार्थांचा सहभाग होता. यातील १५० विद्यार्थी अपंग होते. या उपक्रमाने दक्षिण अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा दात घासण्याचा विक्रम मोडला आहे. अमेरिकेतील विक्रमात १३ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Comment