रेडिओ जॉकी आणि वृत्तनिवेदक क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी

rj
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत मात्र गरज आहे ती योग्य प्रशिक्षणाची. दिल्ली विद्यापीठात सुरू करण्यात आलेला कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायी ठरू शकतो.

तुम्हाला जर रेडिओ जॉकी आणि वृत्तनिवेदक बनण्याची आवड असेल तर दिल्लीतील आर.के. फिल्मस् आणि मिडीया अकॅडमीच्या सहाय्याने आयोजित केलेला अभ्यासक्रम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी रेडिओ जॉकी किंवा वृत्तनिवेदकांचा पार्टटाईम अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठाने सुरू केला आहे.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सामान्य पुस्तकी ज्ञानाबरोबरच , व्यावहारीक ज्ञान दिले जाणार आहे.

माध्यमांचे जाळे वाढत असल्याने, यात रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत.

हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना माध्यमात रेडिओ जॉकी आणि वृत्तनिवेदक बनण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

Leave a Comment