२०१५ मधले टॉप टेन ब्रँडस

[nextpage title=”२०१५ मधले टॉप टेन ब्रँडस”]
collarge
जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये माणसाच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झाला आहे आणि या बदलाचा वेगही प्रचंड आहे. आजच्या युगात ब्रँड हा शब्द इतका जिवाभावाचा बनला आहे की लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व थरात ब्रँड बाबतची समज अधिकाधिक स्वरूपात येऊ लागली आहे. सरत्या वर्षात कोणत्या सुपरब्रॅडचा डंका जगात वाजत राहिला त्यांची ही माहिती [nextpage title=”१) अॅपल”]
apple
टॉप टेन महागड्या ब्रँडमध्ये अॅपलचे नाव टॉपवर राहिले आहे. कंपनीच्या बहुतेक सर्वच उत्पादनांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला व परिणामी त्यांची ब्रँड व्हॅल्यूही वाढली. अॅपलची ब्रँड व्हॅल्यू आहे १४५.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ९५७० अब्ज रूपये. गतवर्षीच्या तुलनेत यात १७ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.[nextpage title=”२) मायक्रोसॉफ्ट”]
micro
ब्रँड व्हॅल्यूत मायक्रोसॉफ्ट दोन नंबरवर असून तिची व्हॅल्यू आहे ६९.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ४५५४ रूपये. हे आकडे पाहिले की टॉप टेन ब्रँडमध्ये सुद्धा पहिल्या दोन नंबरातील फरक खूपच मोठा आहे हे सहज लक्षात येते. मायक्रोसॉफ्टची कमान आता भारतीय वंशाचे सत्या नडेला यांच्या हाती आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही व्हॅल्यू १० टक्क्यांनी वाढली आहे.[nextpage title=”३)गुगल”]
google
जागतिक पातळीवरचे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगल या यादीत ३ नंबरवर आहे आणि विशेष म्हणजे गुगलच्या नाड्याही सध्या भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांच्या हाती आहेत. आगामी वर्षात गुगल कोणते कार्यक्रम राबविणार याची मोठी उत्सुकता आहे. गुगलची ब्रँड व्हॅल्यू आहे ६५.६ अब्ज डॉलर्स म्हणजे ४२९० अब्ज रूपये. गतवर्षीपेक्षा ही व्हॅल्यू १६ टक्कयांनी वाढली आहे.[nextpage title=”४)कोकाकोला”]
coca
जगात शीतपेये क्षेत्रात जगात सर्वतोमुखी नाव आहे ते कोकाकोलाचे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे ३६९६ अब्ज रूपये.[nextpage title=”५)आयबीएम”]
ibm
टेक दिग्गज कंपनी आयबीएम या यादीत पाच नंबरवर आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे ४९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ३२३४ अब्ज रूपये.[nextpage title=”६) मॅकडोनाल्डस”]
macdonald
मॅकडी या नावाची भुरळ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कंपनीने त्यांच्या रेस्टॉरंटसचा विस्तारही मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे २५७४ अब्ज रूपये.[nextpage title=”७)सॅमसंग”]
samsung
ग्लोबल टेक्नॉलॉजी कंपनी सॅमसंग या यादीत सातव्या स्थानावर आहे. सॅमसंगच्या अनेक उत्पादनांनी चांगली लोकप्रियता मिळविली असली तरी त्यातही आघाडीवर आहेत त्यांचे स्मार्टफोन्स. या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आहे ३७.९ अब्ज डॉलर्स म्हणजे २४४२ अब्ज रूपये.[nextpage title=”८) टोयोटा”]
toyota
ग्लोबल कार बेस्ट सेलर असा आपल्या नावाचा दबदबा असलेल्या या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आहे ३७.८ अब्ज डॉलर्स म्हणजे २४४१ अब्ज रूपये.[nextpage title=”९)जनरल इलेक्ट्रीकल्स”]
general-electro
जीएस नावाने ही कंपनी ओळखली जाते. जागतिक दर्जाच्या या कंपनीने भारतातही त्यांचा मोठा विस्तार प्रकल्प राबविला आहे. या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू ३७.५ अब्ज डॉलर्स म्हणजे २४४० अब्ज रूपये आहे.[nextpage title=”१०)फेसबुक”]
facebook
सोशल मिडीया क्षेत्रातील ही कंपनी टॉप टेन ब्रँडमध्ये १० व्या स्थानावर आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू आहे ३६.५ अब्ज म्हणजे २३७६ अब्ज रूपये.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या यादीत मॅकडोनाल्ड, सॅमसंग, टोयोटा, जनरल इलेक्ट्रीकल्स आणि फेसबुक यांच्या व्हॅल्यूतील फरक अगदी कमी दिसतो आहे. त्यामुळे नवीन वर्षात त्यांच्यात कशी प्रगती होतेय आणि कोण कोणत्या स्थानावर येतेय हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.

Leave a Comment