
बंगळूरू – आता देशातील सर्व विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार असून याबाबतचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)ने दिले आहेत. २०१६मधील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने युजीसीने तयारी सुरु केली आहे.
नववर्षात सर्व विद्यापीठात होणार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
युजीसीचे चेअरमन वेद प्रकाश यांनी या संदर्भातील पत्र सर्व विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना पाठविले असून त्यात आगामी जानेवारीत होणाऱ्या सभेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा केली जाणार आहे.
ऑनलाईनमुळे प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता येईल. पालकांना त्यांच्या मुलांचे विद्यापीठात प्रवेश घेताना होणारी ओढाताण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यात मदत होईल.
