या मेट्रो स्टेशनवर आहे महिला राज

jaipur
जयपूर – मेट्रो स्टेशनचे नियंत्रण, सुरक्षा व कस्टमर रिलेशनसह सर्व कारभार महिलांच्या ताब्यात असलेले जगातले पहिले मेट्रो स्टेशन म्हणून जयपूरच्या श्यामनगर स्टेशनची नोंद झाली आहे. या स्टेशनला जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी येथील महिला स्टाफ अक्षरशः दिवसाचे १६-१६ तास काम करत आहे.

या स्टेशनचे नामकरणच प्रथम महिला शक्ती रेल्वे स्टेशन असे केले गेले आहे. दिवाळीत हा लक्ष्मीचा सन्मान आहे असे संचालक सी एस. जीनगर म्हणाले. ते म्हणाले आम्ही या स्टेशनचे ब्रँडींग करणार आहोत कारण जगात या प्रकारचे हे पहिलेच स्टेशन आहे. हे स्टेशन सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेल्या भागात आहे परिणामी येथे महिलांना अधिक सुरक्षित वाटेल. येथे कंट्रोलरची दोन, कस्टम रिलेशनची ४, तिकीट वेंडींग स्टाफ ४, ग्राहक सहाय्यक ८, हाऊस किपिगची १० पदे व सुरक्षाची ४ पदे आहेत आणि ही सर्व पदे महिलांच्या ताब्यात आहेत.

Leave a Comment