ओप्पोचा ४ जीबी रॅमवाला आर७एस स्मार्टफोन लाँच

r7s
मुंबई: दुबईतील एका कार्यक्रमात चीनी मोबाईल कंपनी ओप्पोने आपला नवा स्मार्टफोन आर७एस लाँच केला आहे. याच्या किंमतीचा अद्याप कंपनीने खुलासा केलेला नाही.

सर्वात आधी ऑस्ट्रेलियामध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. त्यानंतर सिंगापूर, तैवान आणि इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल. मात्र, भारतात हा स्मार्टफोन केव्हा लाँच करण्याता येईल याबाबत कंपनीने काहीही घोषणा केलेली नाही.
मायक्रो आणि नॅनो असे दोन सीम स्लॉट ४ जी ड्यूल सीम असणाऱ्या या फोनमध्ये आहेत. आसुसच्या झेनफोन २ या स्मार्टफोनशी याची स्पर्धा असणार आहे.

ओप्पो आर७एसचे फीचर:
या फोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले, प्रोसेसर ऑक्ट कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 615 (MSM8939)चा आहे. याफोन मध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी दिली असून १२८ जीबीपर्यंत याची मेमरी वाढविता येऊ शकते.

Leave a Comment