
नवी दिल्ली- अखेर भारतीय बाजारपेठेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले गुगलचे दोन नवीन स्मार्टफोन विक्रीसाठी दाखल झाले असून फ्लिपकार्ट आणि अँमेझोन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ‘ नेक्सस ५ एक्स’ आणि ‘हुवावे नेक्सस ६ पी’ या दोन्ही स्मार्टफोनची विक्री मंगळवारी दुपारी दोननंतर सुरू झाली आहे.
विक्रीसाठी उपलब्ध गुगलचे दोन स्मार्टफोन
हे स्मार्टफोन गुगलने २९ सप्टेंबरला अमेरिकेत लॉन्च केले होते. त्यावेळी गुगलने या स्मार्टफोनची भारतीय किंमत जाहीर केली होती. ‘नेक्सस ५ एक्स’ची स्मार्टफोन तीन १६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या किंमत ३१ हजार ९०० तर ३२ जीबी असलेल्या ३५ हजार ९०० आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. २१ ऑक्टोबरपासून हे दोन्ही स्मार्टफोन रिटेल शॉपमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
‘नेक्सस ५ एक्स’ काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स
» ५.२ इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » १.८ गिगाहर्ट्झ कॉलकम स्नॅपड्रागन प्रोसेसर » दोन जीबी रॅम » १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १२.३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ६.० लॉलीपॉप » २७०० एमएएच बॅटरी
‘नेक्सस ६ पी’ काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स?
» ५.७ इंच डिस्प्ले » ३२ जीबी इंटरनल मेमरी » ऑक्टाकोर प्रोसेसर » तीन जीबी रॅम » १४४०X२५६० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १२.३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ६.० लॉलीपॉप » ३४५० एमएएच बॅटरी
