
नवी दिल्ली : दिवसागणिक रस्ते वाहतूक बिकट होत असल्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे कठिण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या योजनेचा प्रस्ताव आणत आहेत. ही योजना जर यशस्वी झाली तर सर्व सामान्यांना दिलासा मिळणार आहे आणि हवाई सफर कमी खर्चात त्यांना करता येणार आहे.
मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना हवाई सफरची संधी
दोन लहान शहरांच्या दरम्यान हवाई वाहतूक कमी खर्चात सुरु करून २००० ते २५०० रुपयांत प्रवास करण्याची मोदींची ही नवी योजना आहे. याचा लाभ मध्यमवर्गीय कुटुंबातील हजारो लोकांना या योजनेला मंजुरी मिळाली तर होईल.
याबाबतचा एक प्रस्ताव नागरिक विमान मंत्रालय तयार करीत असून छोट्या शहरात एक ते दोन तासांचा प्रवास यात समाविष्ट असेल. यासाठी २००० ते २५०० रुपये माणसी भाडे असेल. मात्र, एअर इंडिया विमान कंपनीला होणारा तोटा सरकार देईल. त्यासाठी सरकार नॅशनल किंवा इंटरनॅशनल विमानांवर एक उपकर लावणार आहे. जर भारताने ही योजना ३० कोटी लोकांसाठी आणली तर जगात भारत विमान सेवा देणारा तिसरा देश असेल.
