
मुंबई – विविध ११ कंपन्यांना बँकिंग व्यवहार करण्यास प्राथमिक मंजुरी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने दिली असून यात टपाल विभाग, रिलायन्स, बिर्ला, एअरटेल आणि व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांचा समावेश आहे.
आरबीआयकडून बँकिंग क्षेत्रात ११ समूहांना प्राथमिक मंजुरी
आरबीआयकडे पेमेंट बँक म्हणून मर्यादित बँकिंग व्यवसायासाठी ४१ अर्ज आले होते. त्यातील ११ अर्जांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. फिनो पेटेक लिमिटेड, टेक महिंद्र लिमिटेड, चोलामंडलम डिस्ट्रिब्युशन सव्र्हिसेस, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड तसेच दिलीप शांतीलाल संघवी व विजय शेखर शर्मा यांना वैयक्तिकरीत्या बँक व्यवसाय उभारणीस परवानगी मिळाली आहे.
यांना मिळाली प्राथमिक मंजुरी
* रिलायन्स इंम्डस्ट्रिज लिमिटेड
* दिलीप शांतीलाल संघवी
* विजय शेखर शर्मा
* टेक महिंद्र लि.
* नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.
* व्होडाफोन एम-पैसा लिमिटेड
* आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड
* एअरटेल एम कॉमर्स सव्र्हिसेस लि.
* चोलामंडलम डिस्ट्रिब्युशन सव्र्हिसेस
* भारतीय टपाल विभाग
* फिनो पेटेक लिमिटेड
