अबब… १३ लाख रुपयांत सायकल !

audi
नवी दिल्ली – कार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जर्मनीतील ऑडी कंपनीने नुकतीच एक स्पोटर्‌‌स सायकल जपानच्या बाजारात आणली आहे. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे, तिची किंमत होंडा सिटी कारपेक्षाही जास्त आहे. ही सायकल खरेदी करण्यासाठी तब्बल १३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

वजनाने ही सायकल अतिशय कमी असून तिच्या फ्रेमचे वजन अवघे ७२० ग्रॅम आणि संपूर्ण सायकलचे वजन केवळ ५.८ किलोगॅ्रम इतकेच आहे. अर्थातच पाच आयफोन मोबाईल फोन हातात घेतल्यानंतर जे वजन होते त्यापेक्षाही कमी सायकलचे वजन आहे. तिची फ्रेम पूर्णपणे कार्बन फायबरने तयार केली आहे. सायकलसाठी वापरलेली सामुग्री जितकी हलकी तितकीच महागही आहे. ‘जिनिव्हा मोटार शो’मध्ये प्रथमच ही सायकल सादर करण्यात आली.

ऑडी कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, काही निवडक लोकांच्या खास आग्रहाखातर या सायकलची निर्मिती केली जाणार आहे. सध्या फक्त ५० सायकल्स तयार केल्या जाणार आहेत.

Leave a Comment