इस्रोने बनवले अत्याधुनिक रडार

isro
श्रीहरिकोटा- चाचणीसाठी भारतीय अवकाश संस्था इस्रोने भारतातच तयार केलेले मल्टी ऑबजेक्ट ट्रॅकिंग रडार सज्ज झाले असून या रडारचा प्रत्यक्ष उपयोग चाचणीनंतर ३ महिन्यांनी होणार असल्याचे सतिश धवन स्पेस सेंटरचे संचालक एम. वाय. एस. प्रसाद यांनी म्हटले आहे.

पुढील महिन्यात पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणावेळी रडारची चाचणी होईल. ८०० किमीच्या कक्षेतील ३० बाय ३० सेमीचे १० वस्तू एकाचवेळी या रडारद्वारे पाहता येऊ शकतात. जर वस्तू ५० बाय ५० सेंमीची असेल तर १००० किमी वरील अंतराहूनही त्याचे निरीक्षण करता येऊ शकते. २४५ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले रडार हे मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण आहे असे प्रसाद म्हणाले. हेच रडार बाहेरील देशात बनवायचे म्हटले तर किमान ८०० कोटी रुपये लागतील असे ते म्हणाले. या रडारसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची किंमत १०० कोटी पर्यंत जाईल. आम्ही सॉफ्टवेअर इथेच बनवले अशी माहिती संशोधक व्ही. शेशागिरी यांनी दिली. हे रडार बनविण्यासाठी तीन वर्षे लागली.