भारत सायबर गुन्ह्यांमध्ये दुस-या क्रमांकावर

cyber-cirme
नवी दिल्ली : भारतातील सोशल नेटवर्कचा उपयोग संगणक क्षेत्रातील गुन्हेगार करीत असल्याचे स्पष्ट झाले असून अमेरिकेनंतर सोशल नेटवर्कचा उपयोग सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात भारताचा दुसरा क्रमांक आहे. सुरक्षिततेसंबंधी उपाय सुचविणा-या सिमन्टेकने अमेरिकेनंतर सोशल मीडियाद्वारे संगणकीय गुन्हे होण्याचे भारत हे ठिकाण असल्याचे म्हटले आहे.

मोबाईल आणि सोशल नेटवर्कवर श्रीमंत लोकांपर्यंत पोचण्यासाठी गुन्हेगार नवीन पद्धतीचे प्रयोग करीत आहेत. भारतातील सोशल मीडियाशी संलग्न लोकसंख्या त्यांना त्यासाठी तयार क्षेत्र मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सिमन्टेकचे तंत्रज्ञान विक्री (भारत) विभागाचे संचालक तरुण कौर यांनी दिली आहे.

Leave a Comment