ऑनलाईनवर सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अॅप तयार

marriage
दिल्ली – दिल्लीतील नागरिकांना लवकरच महसूल विभागाकडून हवी असलेली प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयांत मारव्या लागणार्‍या चकरांपासून मुक्ती मिळणार आहे. दिल्ली सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी मोबाईलवरून अर्ज करता येईल आणि प्रमाणपत्रे डाऊनलोड करता येतील असे अॅप तयार केले आहे. मे अखेरपासून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

दिल्लीचे विभागीय आयुक्त अश्विनीकुमार या संदर्भात म्हणाले अॅपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते नागरिकांना स्मार्टफोनवर डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यानंतर त्याच्या मदतीने अनेक कामांसाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे म्हणजे मॅरेज प्रमाणपत्र, जात दाखला, मूळ रहिवासी दाखला, जमिनीची कागदपत्रे, इन्कम प्रमाणपत्र अशी सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज करून मिळू शकतील. त्यासाठी भरावे लागणारे शुल्क क्रेडीट अथवा डेबिट कार्डने भरता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल तसेच कार्यालयात वारंवार घालावे लागणारे खेटेही घालावे लागणार नाहीत.

दिल्लीच्या सर्व ११ जिल्ह्यातील डीसी व एसडीएम कार्यालये १५ मे पर्यंत ई ऑफिसेस केली जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment