
उठल्याउठल्या रामप्रहरी फिरायला अथवा पळायला जायचे असेल तर बुटांशिवाय पर्याय नाही. आपल्या मापाचा बूट ही अत्यंत आवश्यक बाब. पण घरात बरेच मेंबर असतील तर प्रत्येकाच्या बुटाचे जोड घरातील बरीचशी जागा व्यापतात. एकाचवेळी सगळ्यांना पळायला अथवा फिरायला जायचे नसेल तर मात्र केवळ एकच बुटाचा जोड सर्व कुटुंबाला वापरता येईल अशी सुविधा जगप्रसिद्ध रिबॉक कंपनीने केली आहे.
सर्व कुटुंबासाठी एकच बूट
या कंपनीने असा बूट तयार केला आहे, जो घरातील कुणाच्याही पायात अगदी फिट बसेल. कदाचित विश्वास बसणार नाही मात्र असा बूट कंपनीने प्रत्यक्षात आणला आहे आणि त्यासाठी पंप टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. यामुळे हा बूट कुणाच्याही पायाचा आकार घेऊ शकतो. त्याची किंमत १४९९९ रूपये असून १० मार्चपासून रिबॉकच्या कुठल्याही शोरूममध्ये तो मिळतो आहे.
