१ रूपयाची गुलाबी नोट एप्रिलमध्ये चलनात

rupaya
मुंबई – गेली वीस वर्षे छपाई बंद असलेल्या १ रूपयांच्या नोटा पुन्हा नव्याने चलनात दाखल होत असून त्यांची छपाई जानेवारी २०१५ पासूनच सुरू झाली आहे. पूर्वीच्या नोटेपेक्षा आकाराने थोडी मोठी असलेली ही नोट गुलाबी हिरव्या रंगात आहे. अर्थसचिवांच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सही असलेल्या या नोटा एप्रिलपासून चलनात येणार आहेत. या नोटेची पहिली गड्डी अर्थसचिव राजीव महर्षी यांनी श्रीनाथजी म्हणजे योगेश्वर कृष्णाच्या चरणी अर्पण केली असून त्यावर श्रीनाथजी, सप्रेम भेट असा मजकूरही लिहिला गेला आहे.

नव्या नोटेच्या डोक्यावर भारत सरकार असे शब्द आहेत. मल्टी टोनर वॉटरमार्क मध्ये अशोक लाट आहे मात्र सत्यमेव जयते नाही. उजवीकडे भारत शब्द आहे. पुढचा भाग गुलाबी हिरव्या रंगाच्या मिश्रणाचा आहे तसेच १ रूपयाचे अधिकृत चिन्ह आणि नवीन नाण्याची प्रतिमाही त्यात आहे.सध्याचे अर्थसचिव राजीव महर्षी यांची सही नोटेवर आहे.

Leave a Comment