मायक्रोमॅक्सचे स्वस्त आणि मस्त फोन

joy
भारतातील बाजारात नंबर एकची कंपनी बनण्याची कामगिरी बजावलेल्या मायक्रोमॅक्सने दोन नवीन फोन बाजारात सादर केले आहेत. जॉय सिरीजमधील एक्स १८०० आणि एक्स १८५० हे दोन फोन अनुक्रमे ६९९ व ७४९ रूपयांत ग्राहकांना उपलब्ध करून दिले गेले आहेत. हे फोन स्मार्टफोन धारकांना बॅकअप फोन म्हणूनही अतिशय उपयुक्त ठरतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

कंपनीचे सीइओ विनित तनेजा म्हणाले, ग्राहकांना सहज परवडतील असे हे दोन्ही फोन आहेत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांच्या सर्व आवश्यक गरजा हे फोन पूर्ण करतील आणि स्मार्टफोनधारकांना बॅकअप फोन म्हणूनही उपयुक्त ठरतील. या दोन्ही फोनसाठी १.७६ इंचाचा स्क्रीन,,०.८ एमपी कॅमेरा, ४ जीबी पर्यंत वाढविता येणारी मेमरी, रेडिओ एफएम अशा सुविधा दिल्या आहेत. या फोनचे बॅटरी लाईफ जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. एक्स १८०० बाजारात आधीपासूनच उपलब्ध असून एक्स १८५० पुढील आठवड्यापर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. युनिक काँबिनेशन, रास्त दर आणि आवश्यक सुविधा असलेले हे फोन असल्याचेही तनेजा म्हणाले.

Leave a Comment