अॅपल पाच अब्ज डॉलर्सचे बॉण्ड जारी करणार

apple
अॅपलने ५ अब्ज डॉलर्स किमतीचे बॉण्ड जारी करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून हे पैसे कंपनी आपलेच शेअर बाजारातून परत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरणार असल्याचे समजते. अॅपलच्या रोख रकमेतील सुमारे ९० टक्के रक्कम ही विदेशात आहे. तेथून हे पैसे परत आणले तर अॅपलला अमेरिकेत ३५ टक्के कर चुकवावा लागणार आहे. कंपनीने गत तिमाहीत विक्रमी १८ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला आहे.

अॅपलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर वाचविण्याबरोबरच अॅपलला त्यांच्या शेअर होल्डरना १३० अब्ज डॉलर्स परत करावयाचे आहेत. तीन वर्षात ही रक्कम २०० अब्ज डॉलर्सवर जाऊ शकते. त्यामुळेंही बॉण्ड जारी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. क्रेडीट रेटिग एजन्सी मुडीजने अॅपलच्या बॉण्डसाठी एएप्लस रेटिग दिले असून कंपनीची कामगिरी पाहता या बॉण्डना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला खात्री आहे.