चिमुकल्यांचा रोबोटिक स्पर्धेत कलाविष्कार

robo
पंढरपूर : रोबोटिक स्पर्धेत चिमुकल्यांच्या कलाविष्काराने स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कलशाचे पूजन कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका रोबोने उद्घाटन प्रसंगी कलशपूजन करताना कलश आणून ठेवला तर दुस-या रोबोने त्याला फुले वाहिली. तिस-या रोबोने आरती ओवाळली तर चौथ्या रोबोने धूप धरून या कलशाला प्रदक्षिणा घातली. हा अनोखा प्रसंग पहायला मिळाला ‘एमआयटी’ तर्फे आयोजित रोबोटिक स्पर्धेत.

पुण्याच्या संस्थेनी आयोजित केलेल्या ज्युनियर रोबोकॉन २०१५ या स्पर्धेचे आयोजन वखारी येथील विश्वशांती गुरुकुल शाळेत आयोजित केले होते. राज्यभरातील इयत्ता तिसरीपासून नववीपर्यंत शिकणारे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.रोबोटिक स्पर्धेत चिमुरड्यांच्या तांत्रिक कलाविष्काराची कमाल पहायला मिळाली. स्पर्धेत अचानक नादुरुस्त झालेला रोबोही छोटे शास्त्रज्ज्ञ खुबीने दुरुस्त करीत होते. स्पर्धेसाठी पुणे , मुंबई , लातूर , नांदेडपासून अनेक लहान मोठ्या गावातून ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी दाखल झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडियाच’ स्वप्न साकार करण्यासाठी अशा स्पर्धाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Comment