
दिल्ली- सतत कोणत्या ना कोणत्या विधानाने वाद निर्माण करणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील मजकुरामुळे पुन्हा एकदा वादास निमंत्रण दिले आहे. यात काटजू यांनी कटरिना कैफ हिला भारताचे राष्ट्रपती बनवावे मात्र शपथ ग्रहणाच्या वेळी तिला शिला की जवानी गाणे म्हणण्यास सांगावे असे लिहिले आहे.
कटरिनाला राष्ट्रपती बनवा- मार्कंडेय काटजू
काटजू यांच्या म्हणण्याप्रमाणे क्रोएशिया सारख्या आर्थिक तंगीतून जात असलेल्या देशानेही ग्रेबर किटरोविक या सुंदर महिलेला राष्ट्रपती बनविले मग आपल्याला ते का शक्य होणार नाही? कटरिनाला भारताचे राष्ट्रपती बनवावे मात्र अट एकच की तिने शपथ घेताना शीला की जवानी गाणे म्हटले पाहिजे. निवडणुकीचे उमेदवार ठरविताना मी नेहमीच सुंदर महिलांना त्यातही चित्रपट अभिनेत्रींना पसंती देतो असे सांगून काटजू म्हणतात की राजकीय नेते चंद्र आणून देईन अशी आश्वासने देतात मात्र जनता हिताची कामे करू शकत नाहीत. अशा वेळी कुणाला तरी निवडून द्यायचेच असेल तर किमान सुंदर चेहरा तरी पाहावा. मिडीयालाही त्यामुळे क्षणिक सुख मिळू शकेल. कारण जनतेला कांही मिळणार नाही हे नक्कीच आहे.
