
पुणे – अष्टविनायकातील एक म्हणून प्रसिद्ध असणा-या श्रीक्षेत्र महागणपती रांजणगावात बाँम्बच्या अफवेने रविवारी मोठी खळबळ उडल्यामुळे काही काळ सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, लोकांची घाबरगुंडी उडाली. परंतु, काही कालावधीनंतर सुरक्षेच्या हेतूने ‘मॉक ड्रिल’ केल्याचे पेलिसांकडून स्पष्ट करण्यात आले, आणि सर्व गावक-यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
श्रीक्षेत्र रांजणगावात ‘बॉम्ब’च्या अफवेने खळबळ
जगभरातील विविध देशांबरोबरच पाकिस्तानात दहशतवाद्यांनी केलेले बाँम्बस्फोट आणि आत्मघातकी हल्ले विचारात घेऊन देशाच्या गृहमंत्रालयाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच, नाताळचा सण व तोंडावर आलेला नववर्षाचा उत्साह या पार्श्वभूमीवर पोलिसांकडू विशेष दक्षता घेण्यात येत आहे. रांजणगाव येथे करण्यात आलेले ‘मॉक ड्रिल’ हे सुद्धा अतिदक्षतेचाच एक भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
