खडसेंच्या जिल्हय़ात ११ शेतक-यांच्या आत्महत्या

eknath-khadse
जळगाव : गेल्या ९ दिवसांत राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्हय़ात ११ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. तर त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या दोन दिवसात तीन शेतकऱयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. राज्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळीची पाहणी करण्यात येत असतानाही आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याने दुष्काळचे भीषण वास्तव अधोरेखीत झाले आहे.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतरही शेतकऱयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यात १८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. त्यात ९ दिवसांत ११ शेतकऱयांनी आपली जीवनयात्रा संपविली. कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळूनच या शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.