विश्वचषक स्पर्धेनंतर महेलाचा क्रिकेटला अलविदा!

mahela
कोलंबो – २०१५ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज महेला जयवर्धनेने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे स्पष्ट संकेत दिले असून इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना हा जयवर्धनेचा श्रीलंकेमधील शेवटचा सामना असणार आहे.

मंगळवारी इंग्लंड विरुध्द होणार एकदिवसीय सामना हा माझा घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना असेल असे जयवर्धनेने टि्वटरवर म्हटले आहे. जयवर्धनेचा जवळचा मित्र आणि संघसहकारी कुमार संगकाराने २०१५ विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनी जयवर्धनेने विश्वचषकानंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

जयवर्धने ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झाला आहे. मधल्याफळीत खेळणारा जयवर्धने नेहमीच श्रीलंकन संघाचा आधारस्तंभ राहिला आहे.

Leave a Comment