
नवी दिल्ली – गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनाकडून आफ्रिकेत पार पडलेल्या अंध क्रिकेट विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.
दोन्ही सदनाकडून विश्वचषक विजेत्या अंध भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या चौथ्या एकदिवसीय अंध विश्वोकप क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विश्वथविजेतेपद पटकावले. त्यांच्या अभिनंदनपर भाषणात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि राज्यसभेमध्ये अध्यक्ष हमिद अन्सारी म्हणाले, संपूर्ण क्रिकेट संघाचे आपण या यशाबद्दल अभिनंदन करतो. आम्ही त्यांना भविष्यात आणखी यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देत आहोत अशा शब्दात कौतुक केले.
