
दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाकिस्तानचा ऑल राऊंडर खेळाडू मोहम्मद हाफीजच्या गोलंदाजीची शैली संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आयसीसीची मोहम्मद हाफीजच्या गोलंदाजीवर बंदी
हाफीजची गोलंदाजीची शैली अबू धाबी येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संशयास्पद आढळली होती. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबतची चाचणी गेल्याच महिन्यात २४ नोव्हेंबर रोजी कऱण्यात आली होती.
या चाचणीच्या अहवालात हाफीजचा चेंडू टाकताना कोपरा १५ डिग्रीपेक्षा जास्त अंतरात वळतो असे म्हटले आहे. या अहवालानुसर आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली आहे.
यापूर्वी सईद अजमलची गोलंदाजीची शैली संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर आयसीसीने बंदी घातली आहे.
