
दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी घसरून कोसळल्याने जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने विमान अँब्युलन्समधून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभाताई आणि कन्या खासदार सुप्रिया सुळे याही आहेत.
शरद पवार जखमी- मुंबईच्या ब्रीच कँडीत दाखल
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पवार आपल्या जनपथवरील घराच्या आवारातच नेहमीप्रमाणे सकाळचा फेरफटका मारत असताना अचानक कोसळले. त्यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाली असून ते कसे कोसळले या विषयी माहिती मिळालेली नाही. तसेच त्यांच्या तब्येतीविषयीही कांही माहिती मिळू शकलेली नाही.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तीनवेळा भूषविले आहे. मनमोहनसिंग सरकारात ते कृषी मंत्री होते. सध्या ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
