
ठाणे – एका रासायनिक कंपनीच्या टॅंकरने अंबरनाथ एमआयडीसीमधील उल्हासनदीमध्ये विषारी रसायन सोडल्यामुळे विषारी वायू तयार झाला. या विषारी वायूची बाधा होऊन उल्हासनगरमध्ये शंभरपेक्षा अधिक नागरीक आजारी पडले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास नागरीकांना अचानक पोटात मळमळणे, उलटया, डोळयांची आग असे त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.
विषारी वायूची उल्हासनगरमध्ये १०० जणांना बाधा
उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात लगेचच या सर्व नागरीकांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
