आता मोदींचे स्वच्छ इंटरनेट अभियान

ravishankar
नवी दिल्ली- देशभर स्वच्छतेबाबत ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू करून जागृती निर्माण करणारे मोदी सरकार आता इंटरनेटही स्वच्छ करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोर्न वेबसाइट असलेल्या संकेतस्थळांची यादी तयार करून ती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे देण्यात येणार असून या वेबसाइट बंद करण्यात येतील.

याबाबत माहिती देताना दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात ब्लॉकिंग होत असल्याने देशात या सेवेचा वेग कमी होत आहे. हा वेग वाढवण्यासाठीही सरकार ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या यंत्रणा आधुनिक करण्याची सूचना करेल. इंटरनेट मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियालाही ही सूचना करण्यात येईल. त्याचबरोबर परदेशात पोर्न वेबसाइटला मान्यता आहे. मात्र, भारतीय संस्कृती आणि परंपरेचा विचार करता देशात अशा वेबसाइट बंद करणे गरजेचे आहे.

दरम्यान, ज्या वेबसाइटवरील मजकूर भारतीय संस्कृतीच्या विसंगत आहे तो तत्काळ काढून टाकणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात हे काम अत्यंत कठीण आहे. कारण, आज जगभरात सुमो कोटी पोर्न वेबसाइट असून इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या वेबसाइट डिटेक्ट करणे त्यावरील मजकूर काढणे कठीण काम आहे.

Leave a Comment