
मुंबई – आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्दितीय स्मृतीदिनी आदरांजली वाहण्यासाठी दुपारी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले. यावेळी प्रथमच स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेबांना राज यांनी आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज-उध्दव एकत्र
त्यानंतर व्यासपीठावर जाऊन राज ठकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शेजारी बसले. प्रसारमाध्यमांची हे दृश्य कॅमे-यात टिपण्यासाठी एक लगबग उडाली होती. राज यांच्या शेजारी शिवसेना नेते संजय राऊत बसले होते. यावेळी तिघांमध्येही मोकळा संवाद दिसून आला. राज यांच्या बरोबर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आले होते.
सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत स्मृतीदिनाच्या निमित्ताने राज आणि उध्दव पुन्हा एकत्र दिसल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे एकत्र येणार ? ही चर्चा सुरु झाली आहे.
