राष्ट्रवादीसोबतच्या हातमिळवणीवर योग्य वेळी बोलू : शहा

amit-shah
औरंगाबाद : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या हातमिळवणीवर योग्य वेळ आल्यावर सगळ्यांना सगळ्या उत्तरे देऊ असे सांगितले. सध्या दोन दिवसांच्या औरंगाबाद दौ-यावर अमित शहा हे आहेत.

या वेळी शहा म्हणाले की आमच्या पक्षाने राज्याला एक तरूण तडफदार मुख्यमंत्री दिला असून जनतेच्या सर्व अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करतील आणि राज्याचा विकास हा भाजप सरकारचा अजेंडा आहे. राष्ट्रवादीशी केलेल्या हातमिळवणीवर शहा यांना विचारले असता, योग्यवेळी सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. यावर आत्ताच काही बोलता येणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. तसेच शिवसेनेशी पुन्हा महायुती करण्यासाठी दोन्ही पक्षातील सदस्यांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे असून, आता याबद्दल काहीच बोलणे उचित नसल्याचे सांगत हा दौरा मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी केल्याचेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले आहे.