
अहमदनगर – दिवाळीच्या काही दिवस अगोदर जवखेडा खालसा या गावातील एका दलित कुटुंबातील तिघांची ह्त्या झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. जाधव वस्तीत राहणा-या संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील संजय जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या तिहेरी हत्याकांडातील पाचही संशयितांची नार्को चाचणी करण्याची परवानगी सोमवारी पाथर्डी न्यायालयाने दिली.
जवखेडा हत्याकांड : नार्को टेस्टला परवानगी
या घटनेनंतर समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलनेही सुरु आहेत.
