
नागपूर – नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर भाजप ठाम असल्याचे म्हटले असून मात्र त्याचवेळी हा चेंडू त्यांनी केंद्राकडे टोलवला. याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर फडणवीस यांनी नागपुरात मिनी मंत्रालय थाटण्याचा विचार सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम – देवेंद्र फडणवीस
सध्या सरकारचा मंत्रालयाचे कामकाज पूर्णपणे संगणकीकृत करण्याचा विचारात असून सरकारी कामकाजासाठी ई प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतरच मिनी मंत्रालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाची बैठक बोलावली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
