
मुंबई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार असून राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आज दिल्लीत काँग्रेसचे आत्मचिंतन
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार असून त्याचबरोबर काँग्रेसचा झालेला पराभव, त्याची कारणे आदींचे आत्मचिंतन या बैठकीत केले जाईल.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्यांच्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
