संसार थाटण्यासाठी शिवसेनेची बैठक सुरू

shivsena
मुंबई : नुकतीच शिवसेना भवनात शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांसोबत शिवसेनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करणार आहेत.

भाजपकडून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेले दबावतंत्र, भाजपसोबत संसार करायचा की नाही, शिवसेनेची पुढील वाटचाल यासंदर्भात ठाकरे हे आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना विधीमंडळ गटनेते पदाच्या निवडीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.